स्पर्धा / पुरस्कार


 

1) विज्ञान संशोधन पुरस्कारः   विजेते

विद्यार्थ्यांनी विज्ञान संशोधनाकडे वळावे याकरिता प्रोत्साहन म्हणून पुरस्कारांची ही योजना सन २००१-०२ सालापासून अंमलात आणली जात आहे. या योजनेखाली एकूण तीन पुरस्कार दिले जातात. 'परशुराम बाजी आगाशे', 'लीला परशुराम आगाशे' आणि 'शरद नाईक' यांच्या नावे दिले जाणारे हे तीन पुरस्कार दरवर्षी दिले जातात.


2) वार्षिक विज्ञान रंजन कथा स्पर्धाः   विजेते

ही स्पर्धा १९७० सालापासून दरवर्षी घेतली जात आहे. या स्पर्धेतील कथेला विषयाचे बंधन नाही. २०१६ सालापर्यंत या स्पर्धेची पारितोषिके सौ. सुनंदा वामनराव देसाई यांच्या नावे देण्यात येत होती. 2017 सालापासून ही पारितोषिके वैद्य रघुनाथशास्त्री गो. तांबवेकर यांच्या नावे देण्यात येत आहेत.***य*


3) वार्षिक विज्ञान निबंध स्पर्धाः   विजेते

१९६७ सालापासून दरवर्षी घेतल्या जाणार्‍या या स्पर्धेत विद्यार्थी गट आणि खुला गट अशी विभागणी करण्यात आली आहे. प्रथम भौगोलिक विभागीय पातळीवर परीक्षण करून विभागीय विजेत्यांमधून राज्यस्तरीय विजेते निवडले जातात. या स्पर्धेसाठी दरवर्षी वेगवेगळे विषय दिले जातात. 2016 सालापर्यंत या स्पर्धेची पारितोषिके प्रा. चिंं.श्री.कर्वे यांच्या नावे देण्यात येत होती.


4) उत्तम विभाग पुरस्कारः   विजेते

परिषदेच्या विभागात निकोप स्पर्धा राहावी या उद्देशाने सन २००२-०३ सालापासून हा पुरस्कार दिला जातो. सर्व विभागांची ग्रामीण आणि शहरी अशा दोन गटात विभागणी केली असून दरवर्षी दिला जाणारा हा पुरस्कार आलटून पालटून ग्रामीण आणि शहरी विभागाला देण्यात येतो.          


5) जय भा. जोशी विज्ञान कथाकथन स्पर्धाः  विजेते

ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी १९९० सालापासून दरवर्षी घेण्यात येत होती. ही स्पर्धा आता बंद झाली आहे. सुरूवातीला मध्यवर्तीद्वारे केले जाणारे या स्पर्धेचे आयोजन त्यानंतर विभागांकडे सोपवण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन शेवटची पाच वर्षे ते जालना विभागाकडे होते.


6) मनोरमाबाई आपटे विज्ञान पुरस्कारः   विजेते

समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने काम करणार्‍या व्यक्ती अथवा संस्था यांना प्रोत्साहन देण्यासाठी १९९३ सालापासून हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार तीन वर्षांतून एकदा दिला जातो.


7) वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठान पुरस्कार / बळीराजा - अण्णासाहेब शिंदे कृषी पुरस्कारः   विजेते

कृषिक्षेत्रात नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त कामगिरी करणार्‍या व्यक्ती अथवा संस्था यांना प्रोत्साहन देण्यासाठी १९९५ सालापासून हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कारही तीन वर्षांतून एकदा दिला जातो.


8) डॉ. रा.वि.साठे / डॉ.टी.एच्.तुळपुळे / डॉ.चंद्रकांत वागळे पारितोषिके   विजेते

वैज्ञक विषयावरील मराठी पुस्तकांना दर तीन वर्षांतून एकदा ही पारितोषिके दिली जातात. डॉ. रा. वि. साठे पारितोषिक १९८९ सालापासून आणि डॉ. टी. एच्. तुळपुळे पारितोषिक हे २००७ सालापासून दिले जात आहे. डॉ.चंद्रकांत वागळे पारितोषिक हे २०१० सालापासून देण्यात येत आहे.


9) व्ही.डी.चौगुले / मुकुंद मोरेश्वर मोहिले पारितोषिक योजनाः   विजेते

शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन पातळीवर दिली जाणारी ही पारितोषिके बालवैज्ञानिक संमेलनातील सर्वोत्तम प्रकल्पांना दर तीन वर्षांतून एकदा दिली जातात.


10) सु.त्रिं.तासकर परिवार लघुद्योजक पुरस्कारः   विजेते

हा पुरस्कार लघुउद्योग क्षेत्रात नाविन्यपूर्ण निर्मिती करणाऱ्या लघुउद्योजकास दिला जातो.*****


11) प्रा. मन मोहन शर्मा विज्ञान तंत्रज्ञान पुरस्कारः   विजेते

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील संशोधनात भरीव कामगिरी करणाऱ्या, विद्यापीठातील आणि महाविद्यालयातील अशा दोन संशोधकांना हे पुरस्कार देण्यात येतात. दरवर्षी देण्यात येणाऱ्या या पुरस्काराची सुरूवात २०१४ सालापासून झाली.


12) राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धाः    विजेते

मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी विज्ञान एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येते. शैक्षणिक आणि खुल्या अशा दोन गटांत घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कोणत्याही विषयावर आधारलेली एकांकिका या स्पर्धेसाठी सादर करता येते. या स्पर्धेची सुरुवात २०१५ सालापासून झाली.


13) हरिभाऊ मोटे पारितोषिकः   विजेते

हे पारितोषिक दरवर्षी उत्कृष्ट बाल विज्ञान वाङ्‌मयासाठी आणि विज्ञान शिक्षण साधनांसाठी आलटून पालटून देण्यात येत होते.


14) मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पुरस्कारः    विजेते

मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी, अभियांत्रिकी क्षेत्रात व्यावहारिक उपयुक्तता असणाऱ्या उत्कृष्ट संशोधनासाठी चाळीस वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या अभियंत्यास हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कारासाठी अभियांत्रिकीचे क्षेत्र दरवर्षी वेगवेगळे असते.


15) पोस्टाद्वारे विज्ञान परीक्षा

मराठी विज्ञान परिषदेतर्फे १९९८ सालापासून मराठी माध्यमातून, तर २००४ सालापासून इंग्रजी माध्यमातून टपालाद्वारे विज्ञान परीक्षा घेतल्या जातात. इयत्ता सातवी, आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षांत, प्रत्येक माध्यमात तीनही इयत्तांतील गुणानुक्रमे पहिल्या तिघांना पारितोषिके दिली जातात.