पहिलं पान...


मनोरंजक विज्ञानः स्वयंपाकघरातील विज्ञान

दिनांक ९ जून, २०१९ (रविवार) रोजी दुपारी ३.३० ते ५.०० या वेळेत परिषदेच्या चुनाभट्टी येथील विज्ञान भवनात स्वयंपाकघरातील विज्ञान या संकल्पनेवर ‘मनोरंजक विज्ञान’ हा कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम विज्ञान अधिकारी श्रीमती अनघा वक्टे घेतील. हा कार्यक्रम सशुल्क आहे.


सुवर्णमहोत्सवी व्याख्यानमालाः सुरक्षित व पौष्टिक आहार

दिनांक १५ जून, २०१९ (शनिवार) रोजी सायंकाळी ५ वाजता मराठी विज्ञान परिषद आणि नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्स यांच्या संयुक्‍त विद्यमाने सुरक्षित व पौष्टिक आहार या विषयावर डॉ. प्रकाश कोंडेकर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. हे व्याख्यान परिषदेच्या चुनाभट्टी येथील विज्ञान भवनात होणार आहे. व्याख्यानास प्रवेश विनामूल्य.


विज्ञानगंगा व्याख्यानमालाः बहुपयोगी गणित

दिनांक २१ जून, २०१९ (शुक्रवार) रोजी सायंकाळी ५ वाजता मराठी विज्ञान परिषद आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्‍त विद्यमाने बहुपयोगी गणित या विषयावर मराठी विज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. विवेक पाटकर यांचे व्याख्यान होईल. हे व्याख्यान यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, मंत्रालयाजवळ, मुंबई -  ४०० ०३२ येथील चौथ्या मजल्यावर होईल. व्याख्यानास प्रवेश विनामूल्य.


मराठी विज्ञान परिषदेचा झेंडा

मराठी विज्ञान परिषदेचा झेंडा असावा अशी सूचना आली आहे. तेव्हा हा झेंडा कसा असावा हे ठरवण्यासाठी परिषदेतर्फे स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेची सविस्तर माहिती खालील माहितीपत्रकात माहिती दिली आहे. स्पर्धेसाठी आपण ३० जून २०१९ पर्यंत चित्र पाठवू शकता. ज्या स्पर्धकाचा झेंडा निवडला जाईल त्या स्पर्धकाला रू. ५००० इतक्या रकमेचे पारितोषिक दिले जाईल.