|
मराठी विज्ञान
परिषद पत्रिका
मराठीतून विज्ञान-तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम
परिषद आपल्या मुखपत्राद्वारे 1967 सालापासून करत आहे. ‘मराठी विज्ञान परिषद
वार्तापत्र’ या नावाने जानेवारी 1967 ते मार्च 1968 या काळात सुरु असलेले हे मासिक
एप्रिल 1968 पासून ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिका’ या नावाने प्रसिद्ध होऊ
लागले. सध्या वर्षभरात ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिके’चे 32 पानांचे 11 अंक आणि
सुमारे 150 पानांचा दिवाळी अंक असे 12 अंक वर्गणीदारांना पाठवले जातात. दरमहा
ताज्या विषयावर मुखपृष्ठ कथा तसेच इतर विषयावर लेख यामध्ये समाविष्ट असतात.
क्षितीजरेखा (विज्ञान संशोधन), अंतराळातून (खगोलशास्त्र), कन्सलटींग रुम (वैद्यकशास्त्र), परिचित-अपरिचित
(नेहमीच्या वापरातले तंत्रज्ञान) अशी सदरे नियमितपणे असतात. गंमत जंमत हे चार
पानी खास विद्यार्थ्यांकरिताचे सदरही दर महिन्याला असते. याखेरीज पुस्तक
परीक्षणे, विज्ञान कथा, यांचाही अंतर्भाव केला
जातो.
|