मराठी विज्ञान परिषद (निप्पाणी विभाग)

द्वाराः श्री.बाबासाहेब मगदूम, विश्वास शिंदे नगर रोड, वाळवे मळा, निप्पाणी, जिल्हा बेळगाव (कर्नाटक), पीन 591237 (दूरध्वनी क्र.‍: 9731756317)

 

                                                                                                                                                              

 

उद्‌घाटन समारंभ

 

 

 मराठी विज्ञान परिषदेच्या निप्पाणी विभागाचे दिनांक ०८ ऑगस्ट २०११ रोजी अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे (माजी संचालक, इंदिरा गांधी सेंटर फॉर टॉमिक रिसर्च) यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले, त्यावेळचे हे छायाचित्र.

 

या कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. शिवराम भोजे,  श्री.अ.पां.देशपांडे (कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद - मध्यवर्ती), प्रा.के.एस.रायबागी (अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद, निप्पाणी विभाग), श्री.बाबासाहेब मगदूम (कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद, निप्पाणी विभाग), श्री.शिवाजीराव पवार (अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद, कोल्हापूर विभाग) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रा.ए.जी.वांद्रे यांनी या वेळी स्वागत व प्रास्ताविक केले. परिषदेच्या निप्पाणी विभागाचे उपाध्यक्ष डॉ.पी.डी.शिरगावे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाला डॉ.सी.बी.कुरबेट्टी, श्री.प्रवीणभाई शाह यांच्यासह निपाणीतील मान्यवर, विज्ञान शिक्षक, विज्ञानप्रेमी नागरिक उपस्थित होते. कोषाध्यक्ष श्री.पी.एम.सुतार यांनी सूत्रसंचालन केले, तर श्री.एस.एस.चौगुले यांनी आभार मानले.

 

दैनंदिन जीवनामध्ये विज्ञानाचे अनेक प्रयोग घडत असतात. पण त्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष न देता त्याचा जीवनात उपयोग करून घेतला जात नसल्याचे मत डॉ.शिवराम भोजे यांनी व्यक्त केले. भविष्यातील पिढी विज्ञाननिष्ठ होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रूजवण्याची गरज असल्याचे प्रतिपादनही डॉ. भोजे यांनी केले. उदघाटनासाठी आलेल्या मान्यवरांनी यावेळी आडी येथील मल्लिकार्जुन डोंगराच्या परिसराला भेट दिली. त्या वळी श्री.बाबासाहेब मगदूम यांनी राबवलेल्या किरणोत्सव कार्यक्रमाचीही सर्वांनी माहिती घेतली.

 

(पहिल्या पानावर)