|
|
|
|
|
|
पुरस्कार/स्पर्धा... 1) विज्ञान संशोधन पुरस्कार विद्यार्थ्यांनी विज्ञान संशोधनाकडे वळावे याकरिता
प्रोत्साहन म्हणून पुरस्कारांची ही योजना सन 2001-02 पासून अंमलात आणली जात आहे. इ.स. 2010 सालच्या स्पर्धेची नियमावली ֯पहिल्या
पाना’वर प्रकाशित केली आहे. 2) हरिभाऊ मोटे पारितोषिक हे पारितोषिक दरवर्षी उत्कृष्ट बाल विज्ञान वाङ्मयासाठी आणि विज्ञान शिक्षण साधनांसाठी आलटून पालटून दिले जाते.
3) सौ. सुनंदा वामनराव देसाई विज्ञान रंजन कथा स्पर्धा 1970 सालापासून ही स्पर्धा दरवर्षी घेतली जात आहे. या स्पर्धेतील कथेला विषयाचे बंधन नाही.
4) प्रा. डॉ. चिं. श्री. कर्वे विज्ञान निबंध स्पर्धा 1967 पासून दरवर्षी घेतल्या जाणार्या या स्पर्धेत विद्यार्थी गट आणि खुला गट अशी विभागणी करण्यात आली आहे. प्रथम भौगोलिक विभागीय पातळीवर परीक्षण करून विभागीय विजेत्यांमधून राज्यस्तरीय विजेते निवडले जातात. या स्पर्धेसाठी दरवर्षी वेगवेगळे विषय दिले जातात.
5) उत्तम विभाग पुरस्कार परिषदेच्या विभागात निकोप स्पर्धा राहावी या उद्देशाने सन 2002-03 पासून हा पुरस्कार दिला जातो. सर्व विभागांची ग्रामीण आणि शहरी अशा दोन गटात विभागणी केली असून दरवर्षी दिला जाणारा हा पुरस्कार आलटून पालटून ग्रामीण आणि शहरी विभागाला देण्यात येतो.
6) जय भा. जोशी विज्ञान कथाकथन स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा 1990 पासून दरवर्षी घेण्यात येते. सुरूवातीला मध्यवर्तीद्वारे केले जाणारे या स्पर्धेचे आयोजन आता विभागांकडे सोपवण्यात आले आहे. सध्या ही स्पर्धा सांगली विभागातर्फे घेतली जाते.
7) उकिडवे पारितोषिक योजना या योजनेद्वारे दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांकरीता निबंध स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेसाठी दरवर्षी वेगवेगळे विषय दिले जातात. 1997 पासून या योजनेची अंमलबजावणी परिषदेचा रोहा विभाग करीत आहे.
8) मनोरमाबाई आपटे विज्ञान पुरस्कार समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने काम करणार्या व्यक्ती अथवा संस्था यांना प्रोत्साहन देण्यासाठी 1993 सालापासून हा पुरस्कार दिला जातो. तीन वर्षांतून एकदा दिला जाणारा हा पुरस्कार आता 2010 साली दिला जाईल.
9) वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठान पुरस्कार कृषिक्षेत्रात नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त कामगिरी करणार्या व्यक्ती अथवा संस्था यांना प्रोत्साहन देण्यासाठी 1995 सालापासून हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कारही तीन वर्षांतून एकदा दिला जात असून पुढचा पुरस्कार 2010 साली दिला जाईल.
10) डॉ. रा. वि. साठे पारितोषिक आणि डॉ. टी. एच्. तुळपुळे पारितोषिक वैज्ञक विषयावरील मराठी पुस्तकांना दर तीन वर्षांतून एकदा ही पारितोषिके दिली जातात. डॉ. रा. वि. साठे पारितोषिक 1989 पासून आणि डॉ. टी. एच्. तुळपुळे पारितोषिक हे 2007 पासून दिले जात आहे. ही दोन्ही पारितोषिके यानंतर 2010 साली दिली जातील.
11) व्ही. डी. चौगुले पारितोषिक योजना शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन पातळीवर दिली जाणारी व्ही. डी. चौगुले विज्ञान प्रकल्प पारितोषिके दर तीन वर्षांतून एकदा दिली जातात. 1998 पासून दिली जात असलेली ही पारितोषिके यानंतर 2010 साली वितरीत केली जातील. |