परिषदेबद्दल...


नोंदणीः

  • सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट: १८६० नुसार क्र.: BOM 81/66/GBBSD (दिनांक 12-8-1966)
  • बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट: १९५० नुसार क्र.: F-1429/BOM (दिनांक 6-9-1966)
  • परकीय चलनातील देणग्यांसाठीः FCRA प्रमाणपत्र क्रमांकः 084020008 (दिनांक 14/05/2012)

(परिषदेला दिल्या जाणार्‍या देणग्या या कलम ८०-जी नुसार आयकर सवलतीस पात्र आहेत.)


परिषदेचे उद्देश

१. विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणे.
२. विज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करणे.
३. विज्ञानाचे जीवनात महत्त्व वाढवणे.
४. वैज्ञानिक संशोधन व विज्ञानाची प्रगती करणे

हे उद्देश साध्य करण्यासाठी परिषद मध्यवर्तीद्वारे तसेच विविध विभागांद्वारे नानाविध उपक्रम करीत असते. शहरांमध्ये आणि खेडयांमध्ये, विद्यार्थ्यांत आणि नागरिकांमध्ये परिषद काम करते. परिषदेतर्फे अंध आणि मूकबधिरांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. समाजातील सर्व व्यक्तींमध्ये विज्ञानाबद्दल जागरुकता आणि जाणीव निर्माण करणे, तसेच त्यांचा सहभाग कामामध्ये मिळवणे अशा रितीने परिषदेची कामे चालतात. परिषदेच्या मध्यवर्ती संस्थेचे विविध वर्गाचे मिळून साडेतीन हजारांहून अधिक सभासद आहेत. परिषदेचे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात मिळून ६४ ठिकाणी तर महाराष्ट्राबाहेर वडोदरा, गोवा, भोपाळ व बेळगाव या ४ ठिकाणी विभाग आहेत. या विभागांमार्फत मध्यवर्ती कडून निर्देशित केलेले तसेच अनेक स्वतंत्र कार्यक्रम वर्षभर घेतले जातात.


परिषदेचे व्यवस्थापन

परिषदेचे विश्वस्त मंडळ असून त्यात खालील 7 विश्वस्तांचा समावेश आहे.

१) प्रा. जयंत नारळीकर
२) डॉ. अनिल काकोडकर
३) श्री. प्रभाकर देवधर
४) डॉ. विजय केळकर
५) श्री. प्रमोद लेले
६) श्रीमती अचला जोशी
७) डॉ. विजया वाड

प्रा. ज्येष्ठराज जोशी (माजी संचालक, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई) हे परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

परिषदेच्या कार्यकारिणीवरील सदस्यांची संख्या एकूण २३ असून त्यांत चार उपाध्यक्ष, तीन कार्यवाह आणि एक कोषाध्यक्ष यांचा अंतर्भाव आहे. याखेरीज परिषदेशी संलग्न असलेल्या सर्व विभांगांचा एक-एक प्रतिनिधी कार्यकारिणी सदस्य असतो. कार्यकारिणीची सभा ही वर्षातून दोनदा घेतली जाते. कामाजाच्या सोयीकरीता परिषदेचे पदाधिकारी आणि मुंबईत स्थायिक असलेले कार्यकारिणी सदस्य यांची स्थायी समिती नेमण्यात आली आहे. स्थायी समितीची सभा दरमहा एकदा घेतली जाते. परिषेचे दैनंदिन काम पाहण्यासाठी १५ पूर्णवेळ कर्मचारी आहेत. परिषदेच्या कामाची आखणी कार्यकारिणी करत असते. विनावेतन काम करणार्‍या व्यक्ती हे काम करत असतात. परिषदेची वार्षिक उलाढाल सुमारे पन्नास लाख रुपयांची आहे. विविध स्वरूपाच्या वैयक्तिक तसेच संस्थांद्वारे मिळणार्‍या देणग्या, कार्यक्रमांचे शुल्क, सभासद वर्गणी आणि काही प्रमाणांत पत्रिकेकरीता मिळणार्‍या जाहिराती हे परिषदेच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत.


पुरस्कार

मराठी विज्ञान परिषदेला फाय फाऊंडेशन (इचलकरंजी) विज्ञान तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मुंबई) यांच्याकडून उत्तम कार्यासाठी पुरस्कार मिळाले आहेत. डिसेंबर १९९८ मध्ये परिषदेतर्फे प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या 'मराठी विज्ञान परिषद पत्रिका' या मासिकाला महाराष्ट्र फाऊंडेशनचा वैचारिक मासिक म्हणून पुरस्कार मिळाला; महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार २००७ सालच्या पत्रिकेच्या दिवाळी अंकाला मिळाला; तसेच महाराष्ट्र राज्य, साहित्य आणि संस्कृती मंडळाचा ‘दिवाळी अंक शताब्दी वर्ष २००८’ चा द्वितीय पुरस्कारही मिळाला आहे. मराठी भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा, ‘कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार’ हा पुरस्कारही २०१८ साली मराठी विज्ञान परिषदेला देण्यात आलाआहे.


 

संमेलनाचे/अधिवेशनांचे अध्यक्ष

परिषदेतर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या विज्ञान संमेलनांचे/अधिवेशनांचे अध्यक्षपद आतापर्यंत विविध मान्यवरांनी भूषवले आहे. आतापर्यंतच्या सर्व संमेलनाध्यक्षांची/अधिवेशनाध्यक्षांची नावे पुढील जोडणीद्वारे पाहता येतील. (टीपः पहिली अडतीस संमेलने ही ‘संमेलन’ या नावे ओळखली जात होती. एकोणचाळिसाव्या संमलनापासून, या संमेलनांना ‘अधिवेशन’ म्हटले जाऊ लागले.)

 


वार्षिक अहवाल (२०१८-१९)

 

 

 

 


परिषदेच्या माजी अध्यक्षांची नावे

डॉ. रा.वि.साठे (१९६६-१९७६)
श्री. म.ना.गोगटे (१९७६-१९८२)
प्रा. भा.मा.उदगावकर (१९८२-१९९१)
प्रा. जयंत नारळीकर (१९९१-१९९४)
डॉ. वसंत गोवारीकर (१९९४-२०००)
श्री. प्रभाकर देवधर (२०००-२०१४)


 

 

परिषदेचे सन्मान्य सभासद

परिषदेतर्फे विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मान्य सभासदत्व देऊन गौरवले जाते. परिषदेतर्फे आतापर्यंत ज्यांना सन्मान्य सभासदत्व बहाल केले आहे अशा व्यक्तींची यादी पुढील जोडणीद्वारे पाहता येईल.