|
|
|
|
|
|
परिषदेबद्दल…
नोंदणीः सोसायटी रजिस्ट्रेशन अॅक्ट: 1860 नुसार क्र.: BOM 81/66/GBBSD (दिनांक 12-8-1966) बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अॅक्ट: 1950 नुसार क्र.: F-1429/BOM (दिनांक 6-9-1966)
(परिषदेला दिल्या जाणार्या
देणग्या या कलम 80-जी नुसार आयकर सवलतीस पात्र आहेत.)
परिषदेची उद्दिष्टेः
ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी परिषद मध्यवर्तीद्वारे तसेच विविध विभागांद्वारे नानाविध उपक्रम करीत असते. शहरांमध्ये आणि खेडयांमध्ये, विद्यार्थ्यांत आणि नागरिकांमध्ये परिषद काम करते. परिषदेतर्फे अंध आणि मूकबधिरांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात.
समाजातील सर्व व्यक्तींमध्ये
विज्ञानाबद्दल जागरुकता आणि जाणीव निर्माण करणे, तसेच त्यांचा सहभाग कामामध्ये मिळवणे अशा रितीने परिषदेची कामे चालतात. परिषदेच्या
मध्यवर्ती संस्थेचे विविध वर्गाचे मिळून साडेतीन
हजारांहून अधिक सभासद आहेत. परिषदेचे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात मिळून 66 ठिकाणी तर महाराष्ट्राबाहेर वडोदरा, गोवा, भोपाळ व बेळगाव या 4 ठिकाणी विभाग आहेत. या विभागांमार्फत मध्यवर्ती कडून निर्देशित केलेले तसेच अनेक
स्वतंत्र कार्यक्रम वर्षभर घेतले जातात. मराठी विज्ञान परिषदेला फाय फाऊंडेशन, इचलकरंजी आणि विज्ञान तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार यांच्याकडून उत्तम कार्यासाठी पुरस्कार मिळाले आहेत. डिसेंबर 1998 मध्ये मराठी विज्ञान परिषद पत्रिकेला महाराष्ट्र फाऊंडेशनचा वैचारिक मासिक म्हणून पुरस्कार मिळाला; महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार 2007 सालच्या पत्रिकेच्या दिवाळी अंकाला मिळाला; तसेच महाराष्ट्र राज्य, साहित्य आणि संस्कृती मंडळाचा ‘दिवाळी अंक शताब्दी वर्ष 2008’ चा द्वितीय पुरस्कारही मिळाला आहे.
परिषदेतर्फे
दरवर्षी घेण्यात येणाऱ्या विज्ञान संमेलनांचे अध्यक्षपद आतापर्यंत विविध मान्यवरांनी
भूषवले आहे. इ.स.१९६६ सालच्या पहिल्या संमेलनापासून आतापर्यंत झालेल्या सर्व
संमेलनाध्यक्षांची यादी पुढे जोडली आहे. संमेलनाध्यक्षांची
यादी परिषदेचे व्यवस्थापनः परिषदेचे विश्वस्त मंडळ असून त्यात खालील 7 विश्वस्तांचा समावेश आहे.
1. प्रा. जयंत नारळीकर 2. डॉ. स्नेहलता देशमुख 3. डॉ. माधव चव्हाण 4. डॉ. विजय केळकर 5. श्री. कुमार केतकर 6. श्री. प्रमोद लेले 7. श्रीमती अचला जोशी
परिषदेच्या कार्यकारिणीवरील सदस्यांची संख्या एकूण 23 असून श्री. प्रभाकर देवधर (माजी अध्यक्ष, इलेक्ट्रॉनिक आयोग, भारत सरकार) हे विद्यमान अध्यक्ष आहेत. परिषदेच्या इतर पदाधिकार्यांत पांच उपाध्यक्ष, तीन कार्यवाह आणि एक कोषाध्यक्ष यांचा अंतर्भाव आहे.याखेरीज परिषदेशी संलग्न असलेल्या सर्व विभांगांचा एक-एक प्रतिनिधी कार्यकारिणी सदस्य असतो. कार्यकारिणीची सभा ही वर्षातून दोनदा घेतली जाते.
कामकाजाच्या सोयीकरीता परिषदेचे पदाधिकारी आणि मुंबईत स्थायिक असलेले कार्यकारिणी सदस्य यांची स्थायी समिती नेमण्यात आली आहे. स्थायी समितीची सभा दरमहा एकदा घेतली जाते.
परिषदेचे दैनंदिन काम पाहण्यासाठी 17 पूर्णवेळ कर्मचारी आहेत. परिषदेच्या कामाची आखणी कार्यकारिणी करत असते. विनावेतन काम करणार्या व्यक्ती हे काम करत असतात. परिषदेची उलाढाल सुमारे 50 लाख रुपयांची आहे. विविध स्वरूपाच्या वैयक्तिक तसेच संस्थांद्वारे मिळणार्या देणग्या, कार्यक्रमांचे शुल्क, सभासद वर्गणी आणि काही प्रमाणांत पत्रिकेकरीता मिळणार्या जाहिराती हे परिषदेच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत.
परिषदेच्या माजी अध्यक्षांची
नावेः (1) डॉ. रा.वि.साठे (1966 - 76) (2) श्री. म.ना.गोगटे (1976 - 82) (3) प्रा. भा.मा.उदगावकर (1982 - 91) (4) डॉ. जयंत नारळीकर (1991 - 94) (5) डॉ. वसंत गोवारीकर (1994 - 2000) परिषदेसाठी तुम्ही काय करू शकता? - परिषदेचे सभासदत्व (सभासदत्वाच्या
विविध योजना, प्रकार)
|
Site hosted
by www.yourebusinessportal.com