पहिलं पान...


शहरी शेती ओळखवर्ग

परिषदेतर्फे दर महिन्याला शहरी शेती ओळखवर्ग घेतला जातो. यापुढील ओळखवर्ग हा रविवार, दिनांक 1 एप्रिल 2018 रोजी होणार आहे. या ओळखवर्गाची वेळ ही सकाळी 10.30 ते दुपारी 01.30 अशी असेल. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी परिषदेच्या कार्यालयात संपर्क साधावा.


मनोरंजक विज्ञान : काड्यांची खेळणी

परिषदेतर्फे दर महिन्याला मनोरंजक विज्ञान हा कार्यक्रम घेण्यात येतो. या कार्यक्रमात मनोरंजनाद्वारे विज्ञानाशी ओळख करून दिली जाते. या पुढील कार्यक्रम हा रविवार, दिनांक 8 एप्रिल 2018 परिषदेच्या चुनाभाट्टी येथील विज्ञान भवनात होणार आहे. कार्यक्रमाची वेळ दुपारी 03.30 ते 05.00 या वेळेत होणार आहे. अधिक माहितीसाठी परिषदेच्या कार्यालयात संपर्क साधावा.


कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार - 2017

मराठी भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा, ‘कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार’ हा पुरस्कार या वर्षी मराठी विज्ञान परिषदेला देण्यात आला. सामान्य माणसापर्यंत मराठी भाषेतून विज्ञान पोहोचवण्याच्या दृष्टीने, परिषद करीत असलेल्या गेल्या पाच दशकांच्या प्रयत्नांना मिळालेली ही मोठी पावती आहे. विविध विषयांवरील अभ्यासवर्ग, व्याख्याने, पुस्तके, इ-पुस्तके, मासिक, अशा विविध माध्यमांद्वारे, परिषद मराठीतून विज्ञानप्रसाराचे हे कार्य करीत आली आहे. या अभिमानास्पद गौरवाला पात्र होण्यासाठी, परिषदेच्या सत्तरहून अधिक विभागांतील परिषदेचे कार्यकर्ते, हितचिंतक, देणगीदार, कर्मचारीवृंद, अशा अनेक घटकांचा हातभार लागला आहे. या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!

विज्ञान संशोधन स्पर्धा (2017) - अंतिम निकाल

मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या विज्ञान संशोधन स्पर्धा (2017) चे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. या स्पर्धेत सर्वोत्तम ठरलेल्या तीन प्रकल्पांचा आणि ते सादर करणाऱ्या स्पर्धकांची नावे खालील प्रमाणे आहेत.  विजेत्यांना रविवार, दिनांक 29 एप्रिल 2018 रोजी साजऱ्या होणाऱ्या परिषदेच्या बावन्नाव्या वर्धापनदिनाच्या समारंभात पारितोषिके देण्यात येतील. प्रत्येक विजेत्या गटाला रू. 12,000 तसेच मानपत्र व गौरवचिन्ह देण्यात येईल. प्रकल्पाच्या मार्गदर्शकांना रू. 2,000 आणि मानपत्र देण्यात येईल.

♦ अँड्रॉइड प्रणालीद्वारे नियंत्रित करता येणारे स्वच्छता यंत्र - निनाद पायघण, अर्जुन शिंदे आणि निशान्त डोंगरे (श्री. रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, नागपूर)
♦ साबुदाणा आणि राखेपासून तयार केलेले, पॉलिथिनला पर्याय ठरणारे जैविक-प्लास्टिक - तृप्ती जोशी आणि ओंकार पेंढारकर (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्‍नागिरी)
♦ गायी-गुरांतील फॉस्फोरसचे प्रमाण शोधणारा, सहज वापरता येणारा चाचणी संच - श्वेता साबू आणि कीथ डी’सोझा (इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई)

विजेत्या स्पर्धकांचे परिषदेतर्फे मनःपूर्वक अभिनंदन!